Ad will apear here
Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘मुलगी झाली हो!’ नाट्याचा प्रयोग

पुणे : रयत शिक्षण संस्थेच्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात लोकायत सामाजिक संस्था आणि मराठी विभाग यांच्या वतीने ज्योती म्हापसेकर लिखित ‘मुलगी झाली हो!’ या नाट्याचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.   


कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या वैचारिक जाणिवा अधिकाधिक समृद्ध व्हाव्यात. हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे; तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबर सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, अशा उद्देशाने हा नाट्यप्रयोग आणि परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या प्रयोगानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसंवादामध्ये भाग घेतला. यामध्ये सूर्यकांत सरोदे, रूपाली मुदनोर-काळे, ऋषिकेश कानवटे, कोमल जावीर, आकाश टेंभुर्णीकर, स्वप्नाली कांबळे,  कुमोदिनी, विजय खोरे, अमोल म्हस्के, गौरी कांबळे आदींचा समावेश होता. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य आणि मराठी विभागप्रमुख डॉ. संजय नगरकर यांनी केले. डॉ. अतुल चौरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘आयक्यूएसी’ विभागाच्या चेअरमन डॉ. सविता पाटील यांनी केले. 

कार्यक्रमाला प्रा. भीमराव पाटील, डॉ. सुहास निंबाळकर,  डॉ. हर्षद जाधव, प्रा. कुशल पाखले यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होत
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZRLCD
Similar Posts
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा पुणे : औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात गुरुवार, पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून शाहू कॉलेजच्या माजी प्राचार्या डॉ. शोभा इंगवले उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू पुणे : औंध येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. याचे उद्घाटन नुकतेच कार्यक्रमाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख, मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता आणि आंतरराष्ट्रीय केंद्राचे डायरेक्टर डॉ. विजय खरे यांच्या उपस्थितीत झाले
‘रयत शिक्षण संस्थेमुळे जीवनाचे सोने झाले’ औंध : ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने झाले. मी ही त्यातील एक विद्यार्थी असून, माझ्यासारखे हजारो विद्यार्थी झोपडपट्टी परिसरातून शिक्षणासाठी येत होते; मात्र त्यांना प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. अशा वेळेस डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ औंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष अॅड. राम कांडगे उपस्थित होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language